मुंबईः यूजीसी () अर्थात विद्यापीठ आयोगानं इतिहासाच्या पदवीपूर्वी अभ्यासक्रमातून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर काँग्रेसनं (Congress)केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाची अॅलर्जी असल्याचं म्हणत काँग्रेसनं युजीसीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते यांनी एका वृत्तपत्रातील बातमीचा दाखला देत सरकारवर निशाणा साधला आहे. इतिहासाला धार्मिक व जातीयवादी दृष्टिकोनातून पाहणारे मोदी सरकार भारताचे कधीही न भरून येणारे नुकसान करत आहेत. शिक्षण क्षेत्राचे संघ विचारधारेतून राजकीय फायद्यासाठी विकृतीकरण नव्या पिढीला घातक आहे. काँग्रेसने देश घडवला, सहिष्णू वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. भाजपा देशाचा चेहरा बिघडवत आहे, अशी जोरदार टीका सावंत यांनी केली आहे.

वाचाः

मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला अॅलर्जी आहे. त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ चा इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला. इतिहास हा धर्म, जाती, चांगल्या वाईटाचा नसतो. ती मानवीय प्रवासातील घटनांची नोंद असते. भारताचा प्रवास अभ्यासाचा विषय असावा. मुघल किंवा इतर परकीय शासक हे अत्याचारीच होते हे दाखवून विशिष्ट समाजाप्रती द्वेष निर्माण होऊन राजकीय फायदा घेणे हा मोदी सरकारचा उद्देश आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांचा २१ व्या शतकातील वैज्ञानिक व प्रगतीशील दृष्टिकोन तयार व्हावा व राष्ट्रीय एकता मजबूत व्हावी हा उद्देश नाही. मानवता, करुणा व सद्भावना हे मनुष्याचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये षड्रिपूंचा त्याग हे जीवन ध्येय दर्शवले आहे. द्वेष, तिरस्काराने समाजाची प्रगती साधू शकत नाही. अत्याचाराचीच नोंद घ्यायची असेल तर मनुवादातून बहुजनांवर झालेले हजारो वर्षांचे अत्याचार सर्वात भयानक म्हणावे लागतील. एकलव्य, शंभूकापासून सुरु करुन बौद्ध स्तूप तोडली त्यामागील मानसिकता ही अभ्यासावी लागेल. संघाचा मनुवाद, ब्रिटिशांशी संगनमत व देशविरोधी कारवायाही अभ्यासाव्या लागतील, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here