मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Eknath khadse) यांचे जावई (Girish Chaudhary)यांच्या (ED)कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. जमिनीच्या व्यवहाराशी चौधरी यांचा थेट संबंध असल्याने पुढील तपास आणि अधिक चौकशीसाठी आणखी कोठडी आवश्यक असल्याचे ईडीचे कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने ही वाढ केली. ( son in law ed custody has been extended till july 19)

तिनच दिवसांपूर्वी १२ जुलैला मुंबईतील पीएमएलए कोर्टानं १५ जुलैपर्यंत चौधरी यांची ईडी कोठडी वाढवली होती. त्यानंतर आज सुनावणीदरम्यान ही पुन्हा वाढ करण्यात आली.

खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने ६ जुलैला रात्री अटक केली होती. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा यांची देखील ईडीने चौकशी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर ईडीने एकनाथ खडसे यांनाही समन्स बजावले होते. त्यानंतर ईडीने खडसे यांच आठ तास चौकशी केली. यापुढेही जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा चौकशीचे समन्स बजावले जाईल, असे ‘ईडी’ने स्पष्ट केले होते. आज त्यांचे जावई चौधरी यांची कोठडी आणखी वाढवल्यामुळे खडसे यांच्यापुढील अडचणी अद्याप संपल्या नसल्याचे दिसते. खडसे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ईडी चौधरी यांची उलटतपासणी घेणार असल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे ईडीने गिरीश चौधरी यांची कोठडी वाढवून घेतली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या अहवालात समितीने खडसे यांना क्लिन चिट दिली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. खडसे यांनी या प्रकरणात गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला असून त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपकाही ठेवण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने’

खडसे यांची ८ जुलैला ईडीने तब्बल ८ तास चौकशी केली होती. मात्र, एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here