डोंबिवली : मुंबईत आगीची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली स्टेशनच्या नजीक लक्ष्मीनिवास इमारतीला भीषण आग लागली आहे. लक्ष्मीनिवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गोदाम असून या गोदामात आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

आगीची तीव्रता जास्त असल्याने संपूर्ण परिसरात आगीचे लोळ पसरलेले पाहायला मिळतात. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दुपारी २:५५ वाजताच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकजवळ, मे. कामत मेडिकल समोर, डोंबिवली ( पू.) येथील लक्ष्मी निवास या इमारतीमध्ये भीषण आग लागली आहे.

सदर घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान, २-फायर वाहन व ३-वॉटर टँकर तसेच एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनेत अद्याप पर्यत कोणालाही दुखापत झालेली नाही असे डोंबिवली अग्निशमन केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here