पदासाठी नव्याने निवडणूक घेण्याची मागणी पक्षातील अनेक नेत्यांनी केलीय. यामुळे काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून कलह निर्माण झाल्याचं बोललं जातंय. पण काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी या निव्वळ चर्चा असल्याचं म्हटलंय.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष झाल्या. पक्षात नेतृत्वावरून कुठलाही कलह नाहीए. काँग्रेस कार्यकारिणीनी पक्षाच्या अध्यक्षाची निवड केलीय. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षावरून कुठलाही वाद नाही. आणि काही नेते बोलत असतील तर ते त्यांचं वैयक्तीक मत आहे, असं आनंद शर्मा यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसमध्ये पक्षाची कार्यकारिणी सर्व महत्त्वाचे निर्णय घेते. जेव्हाही निर्णय घेण्याची गरज पडते त्यावेळी पक्षाची घटना आहे आणि कार्यकारिणीही आहे, असं आनंद शर्मा म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्व बदलण्यासाठी निवडणूक घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ही मागणी केलीय. यात वरिष्ठ नेते शशी थरूर आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित यांचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर स्वतःहून राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळेही काँग्रेस पक्षात अस्वस्थता असल्याचं बोललं जातंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times