‘सर्वच राजकीय पक्ष स्वतःचा जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. पक्षसंघटना मजबूत व्हावी यासाठी काँग्रेसही स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये चुकीचं काय आहे?’ असा सवाल करत संजय निरुपम यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.
स्वबळाबाबत भूमिका मांडत असताना संजय निरुपम यांनी महविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही फटकारले आहे. दोन्ही मित्रपक्षांना काँग्रेसची रणनीती का खटकत आहे? काँग्रेसने दुय्यम स्थान स्वीकारून त्यांच्यासोबत काम करावं अशी त्यांची इच्छा आहे का? असा सवालही निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, संजय निरुपम हे विधानसभा निवडणुकीनंतर पक्षापासून काहीसे दुरावले आहेत. राज्यातील काँग्रेस नेत्यांवर त्यांनी अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. कधीकाळी मुंबईत काँग्रेसचे नेतृत्व करणारे निरुपम सध्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. मात्र आता स्वबळाबाबत भूमिका घेत संजय निरुपम पुन्हा काँग्रेस पक्षसंघटनेत सक्रिय होऊ पाहात आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times