मुबई: संसर्गाच्या दुसऱ्या भीषण लाटेतही करोनाला हद्दपार करणाऱ्या धारावीकरांसाठी चिंतेत भर घालणारी बातमी आहे. आज गुरुवारी धारावीत ५ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. याबरोबरच धारावीत आतापर्यंत एकूण ६ हजार ९२९ रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्याच्या घडीला धारावीत एकूण २६ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत धारावीत ६ हजार ५४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत ही दिलासादायक बाब आहे.

दादरमध्ये आढळले ९ नवे रुग्ण

या बरोबरच दादर भागात आज ९ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबर दादरमध्ये आतापर्यंत एकूण ९ हजार ७८७ लोकांना करोनाची लागण झाली. मात्र दादरमध्ये सध्याच्या घडीला १४१ सक्रीय रुग्ण आहेत. याचाच अर्थ दादरमध्ये एकूण ९ हजार ४७२ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

माहीममध्ये आज १० नव्या रुग्णांचे निदान
आज माहीम परिसरात १० नवे करोना बाधित रुग्ण आढळले. माहिमध्ये आतापर्यंत एकूण १० हजार १०६ लोकांना करोनाची लागण झाली. त्यांपैकी ९ हजार ८३९ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले. सध्या माहिममध्ये ६५ सक्रिय रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
मुंबईच्या जी-उत्तर वॉर्डात धारावी, दादर आणि माहीमचा समावेश होतो. वॉर्डाचा विचार करता या वॉर्डात आज गुरुवारी एकूण २४ नवे रुग्ण आढळले, तर एकूण २६ हजार ८३२ लोकांना करोनाची लागण झालेली आहे.

या वॉर्डात सध्या २३२ सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण २५ हजार ८५५ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here