: जिल्ह्यात एकीकडे गटबाजीमुळे शिवसेनेत धुसफूस सुरू असतानाच आता राष्ट्रवादीतील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसच्या आज गुरुवारी जळगावात झालेल्या बैठकीत (Jalgaon Meeting) पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी गटबाजीच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली. एवढ्यावरच न थांबता आदिक यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षात कोणत्याही व्यक्तीसाठी काम करू नका, पक्षासाठी काम करा, अशा सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अविनाश आदिक बुधवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गुरूवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महानगर आणि ग्रामीणचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रवक्ते योगेश देसले, सरचिटणीस नामदेव पाटील, विकास पवार, वाल्मिक पाटील, शहराध्यक्ष मंगला पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘ हे संपर्कप्रमुख म्हणून येणार आहेत’
बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षात असलेल्या गटबाजीबद्दल उघडपणे आपली मते मांडल्याने आदिकांसमोरच अंतर्गत वाद उघड झाले. महिला शहराध्यक्ष मंगला पाटील यांनी शहरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षात असलेल्या गटबाजीबद्दल उघडपणे आपली मते मांडली. त्यानंतर बोलताना अविनाश आदिक म्हणाले की, अजित पवार हे जिल्ह्यात संपर्क प्रमुख म्हणून येणार आहे. त्याआधी या सर्व सेल कार्यरत करा, जिथे अडचणी आहेत, त्या दुरूस्त करा, पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करा, अशा सूचना आदिक यांनी केल्या.

कार्यकर्त्यांच्या तक्रारी
राष्ट्रवादी महानगरच्या बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षात सुरू असलेल्या गटबाजीकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, बैठकीसाठी जो बॅनर लावण्यात आला आहे त्या बॅनरवर जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचादेखील फोटो नाही. हे देखील कार्यकर्त्यांनी निर्दशनास आणून दिले. तसेच विद्यापीठात विविध कामांसाठी पाठबळ मिळत नसल्याची तक्रार काहींनी केली. सांस्कृतिक सेलचे सल्लागार रमेश भोळे यांनी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग असावा, यासाठी पुरेसे सहकार्य होत नसल्याची खंत व्यक्त केली.

जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या गटबाजीवरुन आदिक यांनी नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. तसेच कुठल्याही व्यक्तीसाठी नव्हे तर पक्षासाठी काम करण्याचा सल्ला देत गटबाजी टाळण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here