: अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे भावानेच भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी गणेश मापे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून हरिदास गणेश मापे असं मारेकरी भावाचं नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.
या हत्येनंतर गावकऱ्यांनी हिवरखेड पोलिसांना माहिती दिली आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दोन भावंडांमधे नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला, हे कळू शकले नाही.
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला. रात्री १० वाजताच्या सुमारास मापे कुटुंबात वाद झाला आणि हा एवढा विकोपाला गेला की भावानेच भावावर सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर आरोपी त्याच्या परिवाराला घेऊन घटनास्थळाहून फरार झाला आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलिस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times