मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. तळकोकणाला पावसानं झोडपून काढल्यानंतर मुंबईतही काल मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईबरोबरच ठाणे व नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे. ()

मुंबईसह ठाण्यात गुरुवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे. सतत बरसणाऱ्या या पावसामुळं सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातील काही भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर, सायनचे गांधीमार्केट परिसरातही पाणी साचले आहे. सायनमध्ये पाणी साचल्यानं या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग शहरात येत्या तीन तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्गातही काहीशा विश्रांतीनंतर पावसाला पुन्हा सुरुवात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here