काबूल: पाकिस्तानचा तालिबानला पाठिंबा असल्याच्या चर्चेला बळ देणारे वक्तव्य पाकिस्तानच्या हवाई दलाने दिले आहे. पाकिस्तान सीमेलगतच्या तालिबानच्या ठिकाणांवर अफगाण सुरक्षा दलाने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी पाकिस्तान हवाई दलाने दिली आहे. पाकिस्तान सीमेलगत असलेल्या स्पिन बोल्डक भागावर तालिबानने ताबा मिळवला आहे. या भागाला पाकिस्तानमध्ये चमन बॉर्डर म्हणून ओळखले जाते.

अफगाणिस्तानच्या उपराष्ट्रपतींचा आरोप

काही दिवसांपूर्वीच तालिबानने आक्रमण करून अफगाण सैन्याला हुसकावून लावत हा भाग ताब्यात घेतला होता. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह साहेल यांनी ट्विट करून सांगितले की, पाकिस्तान हवाई दलाने अफगान लष्कर आणि हवाई दलाला इशारा दिला आहे. अफगाणिस्तानने स्पिन बोल्डक भागातून तालिबानला हटवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलल्यास त्याच्या प्रत्युत्तरात कारवाई केली जाईल. पाकिस्तानच्या हवाई दलाकडून तालिबानला काही भागांमध्ये मदत पुरवली जात असल्याचा आरोप साहेल यांनी केला.

वाचा:

वाचा:
पाकिस्तानचा सीमा बंद करण्यास नकार

चमन बॉर्डरवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतरही पाकिस्तानने ही सीमा बंद करण्यास नकार दिला आहे. ही महत्त्वाची सीमा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. दररोज हजारो लोक या भागातून ये-जा करत असतात. ही सीमा बंद केल्यास हजारोजणांना त्रास होईल. तालिबानने या भागातील चौकीवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचा झेंडा हटवला.

अफगाणिस्तानमधील ११६ जिल्ह्यांवर तालिबानचा ताबा

अफगाणिस्तानचे स्वतंत्र प्रशासकीय सुधार आणि नागरी सेवा आयोगाचे अध्यक्ष अहमद नादर नादरी यांनी गुरुवारी म्हटले की, तालिबानने ताबा मिळवलेल्या जिल्ह्यात सरकारी सेवा थांबवण्यात आल्या आहेत. नादरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने ११६ जिल्ह्यातील २६० सरकारी इमारती आणि संपत्तींना आगी लावल्या अथवा त्या नष्ट केल्या आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here