राज्य सरकारमधील विविध मुद्द्यांवर आणि निर्णयांवर उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधींशी चर्चा केली. तसंच राज्य सरकारमधील सहकार्याबद्दल उद्धव ठाकरेंनी यावेळी सोनियांचे आभारही मानले. स्वातंत्र्यवीर सावरकर, सीएए, एनपीआर आणि एल्गार परिषदेच्या मुद्द्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांची ही भेट महत्त्वाची मानली जातेय.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत येऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी आदित्य ठाकरे यांनी स्वतः सोनिया गांधींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन निमंत्रण दिलं होतं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनाही शिवसेनेनं निमंत्रण दिलं होतं. पण या शपथविधी सोहळ्याला तिघांपैकी एकही वरिष्ठ नेता उपस्थित नव्हता. मात्र काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते मुंबईतील शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.
सोनिया गांधींच्या भेटीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times