नागपूर: प्रत्येक कार्यक्रमात स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्षांना डिवचणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष () हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या रडारवर आहेत. राष्ट्रवादीचे नेते () यांनी आज पटोले यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही,’ अशा शब्दांत पटेल यांनी पटोलेंना टोला हाणला आहे.

नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. नाना पटोले यांच्या काही विधानांवरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे. पटोले यांनी स्वबळाचा नारा देताना केलेल्या काही विधानांमुळं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह अन्य काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली होती. त्यावेळी पवारांनी पटोले यांच्याबाबत नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. आता पटेल यांनीही पटोले यांना टोला हाणला आहे. ‘ज्याला जे करायचं आहे ते करू द्या. आमची आघाडी आहे. पण कुठल्याही पक्षाला आम्ही बांधून ठेवलेलं नाही. ते काय करतात, त्यावर आम्ही उत्तरं का द्यायची,’ असा सवाल पटेल यांनी केला.

वाचा:

‘महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. सरकारला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. पुढंही राहणार आहे. एच. के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून बोलतात. त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण पवार साहेबांना भेटले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले. त्याचा अर्थ काय तो समजून घ्या. नाना पटोले रोज बोलतात, त्यावर बोलणं मला शोभत नाही. त्यांच्याविषयी जे काही बोलायचं होतं, त्यावर पवार साहेब बोलले आहेत. त्यामुळं त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही,’ असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

वाचा:

प्रशांत किशोर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. शरद पवारांनंतर त्यांनी राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली होती. त्याबाबत विचारलं असता पटेल म्हणाले, ‘प्रशांत किशोर हे एक सल्लागार आहेत. ते कुठंही जाऊ शकतात. कुणालाही भेटू शकतात. एका व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नसते.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here