म. टा. प्रतिनिधी ।

जळगाव () जिल्ह्यातील () शहरातील सासरवाडीला जाऊन पाहुण्याने आपल्या शालकाचा (मेव्हणा) कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना आज शुक्रवारी समोर आली आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशाल वामन ठोसरे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रोडवर कोर्टाजवळ राहणाऱ्या विशाल ठोसरे या तरुणाच्या बहिणीचे चार वर्षांपूर्वी यावल तालुक्यातील चुंचाळे येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले होते. मात्र, लग्नानतंर विशालच्या बहिणीचे विजय सावकारे याच्यासोबत कौटुंबिक वाद झाले होते. त्यानतंर पुन्हा त्यांच्यात सलोखा होऊन विशालची बहीण सासरी राहत होती.

वाचा:

अशातच काल गुरुवारी रात्री विजय सावकारे हा सासुरवाडीला आला. रात्री त्याने सासरच्या ठोसरे कुटुंबीयांशी वाद घालून गोंधळ घातला. हा वाद मिटल्यानंतर विशाल ठोसरे आपल्या कुटुंबीयांसोबत झोपला होता. आज सकाळी विशाल ठोसरे याच्या आईला जाग आली. त्यावेळी त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. त्यांनी घरातील इतर मंडळीला उठविले. विशाल ठोसरे याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला.

…म्हणून विजय सावकारेवर संशय

विजय सावकारे हा घरात आढळून न आल्याने त्यानेच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी विजय सावकारे याचा शोध सुरू केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here