नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवगठीत ‘श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या सदस्यांची भेट घेतली. राम मंदिर निर्माण शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालं पाहिजे. कुठेही कटूता निर्माण व्हायला नको, असं आवाहन यावेळी मोदींनी ट्रस्टच्या सदस्यांना केलं. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी मोदींच्या भेटीनंतर ही माहिती दिली.

‘राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्यासह चार सदस्यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसंच त्यांना राम मंदिराच्या भूमी पूजनासाठी निमंत्रणही दिलं.

‘देशात कटूता निर्माण होईल असं काही करू नका’

भूमी पूजनाला येण्यावर विचार करेन, असं मोदींनी या भेटीत सांगितलं. भूमी पूजनाची तिथी अद्याप निश्चित झालेली नाही. पण राम मंदिराचे निर्माण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाले पाहिजे. यामुळे देशातील वातावरण बिघडता कामा नये. कुठल्याही प्रकारची कटूता निर्माण होऊ नये, याची काळजी घ्या, असं आवाहन मोदींनी केलंय.

रामनवमीच्या निमित्ताने २५ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत ‘रामोत्सव’ साजरा केला जाईल. या दरम्यान राम जन्मभूमी आंदोलनात योगदान देणाऱ्या देशातील २.७५ लाख गावांमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते जातील, अशी माहिती व्हीएचपीचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here