अहमदनगर: बैलगाडा शर्यती आयोजित करण्यास बंदी आहे. सध्या करोनामुळे तर सर्वच यात्रा-जत्रा आणि कार्यक्रमांनाही बंदी आहे. असे असूनही तालुक्यातील गावात बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे पोलिस पथकासह गावात दाखल झाल्या. मात्र, पथक पोहोचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण निघून गेले. गावातही कोणी भेटले नाही. मात्र, यासंबंधी मिळालेला व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या रजिस्टरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

पारनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. २२ गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शिरापूर गावात बैलगाडा शर्यती सुरू असल्याची माहिती तहसीलदार देवरे यांना मिळाली. त्या ताबडतोब पथक घेऊन गावात आल्या. मात्र त्या गावात पोहोचेपर्यंत शर्यती संपवून सर्वजण पळून गेले होते. घटनास्थळी शर्यत भरविल्याच्या खुणा, भंडारा उधळेला आढळून आला. त्यावरून शर्यती होऊन गेलेल्या माहितीला पुष्टी मिळाली.

वाचा:

घटनास्थळाची पाहणी झाल्यानंतर पथक गावात गेले. तेथेही शुकशुकाट होता. ग्रामपंचायत कार्यालयात एक शिपाई होता. तेथे एक रजिस्टर आढळून आले. त्यामध्ये शर्यतीत भाग घेतलेल्या लोकांची नावे, हिशोब असा मजकूर होता. याशिवाय त्या शिपायाच्या मोबाईलमध्ये शर्यतीचे व्हिडिओ आणि फोटो होते. ते सर्व ताब्यात घेण्यात आले. त्या आधारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार देवरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विनायकुमार बोत्रे यांच्या पथकाने ही करवाई केली. ग्रामविकास अधिकारी मीना जनार्दन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शर्यत आयोजित करणारे गुंडा भोसले, संभाजी नरसाळे, संतोष शिणारे, संतोष गुंजाळ, दत्ता ताठे (रा. शिरापूर ता. पारनेर), अर्जुन लामखडे, रुपेश लामखडे (रा. निघोज ता. पारनेर) यांच्यासह अन्य लोकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीत आढळलेल्या रजिष्टरमध्ये ५६ लोकांची नावे आहेत. त्यांनी यामध्ये सहभाग घेतल्याचे दिसून येत असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here