सूर्यकुमार यादवने द्रविडबाबत कोणते मोठे विधान केले, पाहा…श्रीलंकेतील पहिल्या सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादवने सांगितले की, ” राहुल द्रविड यांच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांची शिकवण्याची शैलीही वेगळी आहे. पण द्रविड यांच्याबरोबर बोलण्यासाठी जाताना बराच विचार करावा लागतो. कारण त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि त्याचबरोबर त्यांच्याजवळ बरेच क्रिकेटपटू असतात. आतापर्यंत बऱ्याच युवा क्रिकेटपटूंना त्यांनी घडवले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघासाठी काही महत्वाच्या गोष्टीही केल्या आहेत. त्यामुळे द्रविड हे एक चांगले प्रशिक्षक आम्हाला लाभले आहेत. कारण ते प्रत्येक खेळाडूची मदत करतात, प्रत्येकाचे ऐकून घेततात. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूला मानसीकरीत्या ते बळकट करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर खेळाडूंना नेमकं काय हवं आहे, याची जाणीवही त्यांना असते आणि या सर्व गोष्टी कशा पूर्ण करता येईल, हेदेखील ते पाहत असतात.”
यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामना दुपारी २.३० मिनिटांनी सुरु होणार होता. पण आता हे तिन्ही एकदिवसीय सामने दुपारी ३.०० वाजता सुरु होणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामने हे रात्री ७.३० वाजता सुरु होणार होते. या सामन्यांच्या वेळांमध्येही आता बदल करण्यात आले आहे. हे तिन्ही ट्वेन्टी-२० सामने आता रात्री ८.०० वाजता सुरु होणार आहेत.
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार. (उप-कर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times