मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने निराश होऊन आत्महत्या केलेल्या या तरुणाच्या कुटुंबीयांनी आज यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. ‘आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला व मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या लोणकर कुटुंबीयांमध्ये स्वप्नील लोणकर यांची आई, वडील आणि बहीण यांचा समावेश होता. (CM Uddhav Thackeray consoled the family of Swapnil Lonakar)

या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर आणि सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे उपस्थित होते. या वेळी स्वप्नील लोणकरची बहीण पूजा हिला नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

शिवसेनेतर्फे ११ लाखांची आर्थिक मदत
काल राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार महेश शिंदे आणि तानाजी सावंत यांनी पुण्यातील हडपसर येथील लोणकर कुटुंबीयांच्या घरी भेट देत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने ११ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा-
शिवसेना तुमच्या सोबत आहे, तुम्ही धीर सोडू नका, अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्यांनी लोणकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वप्नीलची बहीण पूजा लोणकर हिने शिक्षण पूर्ण केले असल्यास आणि तिची नोकरी करण्याची ईच्छा असल्यास तिला नोकरीही मिळवून देऊ असे आश्वासनही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोणकर कुटुंबीयांना दिले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here