नांदेड: आणि महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी शहरात काँग्रेसच्या वतीने गुरुवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोडल्या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नेते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे मोर्चावरील कारवाईने खळबळ उडाली आहे. ( )

वाचा:

नांदेड शहरातील जुना मोंढा ते महात्मा गांधी पुतळा यादरम्यान काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या मोर्चात मोठी गर्दी झाली होती. शेकडो बैलगाड्या आणि सायकल या आंदोलनात उतरवण्यात आल्याने वाहतुकीलाही या भागात ब्रेक लागला होता. याची गंभीर दखल घेत वजीराबाद पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोर्चासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन आणि कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक तथा काँग्रेसचे सचिव उमाकांत पवार आणि काँग्रेसच्या अन्य पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वाचा:

‘वंचित’ने केली होती कारवाईची मागणी

पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसने हा मोर्चा काढला होता. मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्कही नव्हते. त्यामुळेच मोर्चावर आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडीने गुरुवारीच वजीराबाद पोलिसांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. कोविडचे नियम दाखवून आम्हाला आंदोलनास मनाई करण्यात येते आणि तिसऱ्या लाटेचा इशारा देणारे मंत्रीच मोर्चा काढून गर्दी करतात, असे नमूद करत याप्रकरणी कारवाई झालीच पाहिजे अशी मागमी वंचितचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी केली होती. पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही अहमद यांनी दिला होता. दुसरीकडे खासदार संभाजीराजे यांनीही या मोर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘एकीकडे करोनाचा उद्रेक तर दुसरीकडे अशोकरावांचे आंदोलन… त्यात ते म्हणतायत विराट मोर्चा झाला, जोरदार आंदोलन पार पडले अणि त्यात सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे आभारही त्यांनी मानले. आता हे बरोबर आहे का?’, असा सवालच संभाजीराजे यांनी अशोक चव्हाण यांना ट्वीटरच्या माध्यमातून केला होता.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here