नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेट विश्वातील महामुकाबला असतो. आता तर ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान बऱ्याच वर्षांनी आमने-सामने असणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल भुवनेश्वर काय म्हणाला, पाहा…भुवनेश्वर कुमार म्हणाला की, ” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचकारक असतो. कारण या सामन्यात सर्वांवरच जास्त दडपण असते. त्यामुळे या सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळते. पण सध्यातरी मी या सामन्याच्या विचार करत नाही. कारण सध्याच्या घडीला आम्ही श्रीलंकेत वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहोत. त्यानंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका होणार आहे. त्यानंतर आयपीएलचे सामने युएईमध्ये होणार आहेत. त्यामुळे भरपूर क्रिकेट आम्हाला खेळायचे आहे. त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी मी विश्वचषकाच्या सामन्यांचा विचार करत नाही. कारण एकावेळेला मी एका गोष्टीचाच विचार करत असतो. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा सामना काही दिवसांवर येऊन ठेपेल तेव्हा त्याच्याबाबत मी विचार करेन, पण सध्याच्या घडीला तरी या सामन्याबाबत मी विचार करत नाही.”

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकापेक्षा अधिक लढती होण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशात द्विपक्षीय लढती होत नसल्याने फक्त आयसीसीच्या स्पर्धेत सामने होतात. त्यामुळे टीआरपीचे सर्व विक्रम मोडले जातात. भारत आणि पाकिस्तान या संघांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवले तर या दोन्ही संघात फक्त क्वालीफायर्समध्ये लढत होण्याची शक्यता असल्याने आयसीसीने या दोन्ही संघांना एकाच ग्रुपमध्ये ठेवले आहे. जेणेकरून टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघात एकपेक्षा अधिक लढती व्हाव्यात. ओमानमध्ये टी-२० वर्ल्डकपच्या लीग स्टेजच्या क्वालीफायर्स सामने होणार आहेत. यात ८ संघ भाग घेतली. त्यातील चार संघ लीग स्टेजसाठी पात्र ठरतील. या लढती श्रीलंका, बांगलादेश, ओमान, आयर्लंड, नेदरलँड, नामीबिया, स्कॉडलंड आणि पपूआ न्यू गिनी हे संघ असतील. या संघांना दोन गटात विभागला जाईल. गटातील अव्वल दोन संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र होतील. त्यानंतर १२ संघांना दोन गटात विभागले जाईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here