नाशिक: सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सध्या अनिल देशमुख, एकनाथ खडसे व प्रताप सरनाईक या नेत्यांची वेगवेगळ्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. याच मालिकेत आता परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव यांची भर पडली आहे. या दोघांच्याही बंगल्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिली आहे. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक असून त्याची चौकशी सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

वाचा:

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये आले आहेत. तिथं पत्रकारांशी बोलताना त्यांनी नवा गौप्यस्फोट केला. आज रात्री एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते, असं पाटील शुक्रवारी म्हणाले होते. त्यावरून अंदाज लावले जात होते. आपल्या बोलण्याचा रोख कोणाकडं होता असं पाटील यांना आज विचारलं असता त्यांनी खुलासा केला. ‘अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी व्हावी म्हणून न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. नितीन राऊत यांनाही एका प्रकरणात कोर्टानं फटकारलं आहे. संजय राठोड यांचंही प्रकरण प्रलंबित आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्तानं इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केलीय. यापूर्वी अण्णा हजारेंनीही अशी मागणी केलीय. अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीनं सील केलीय. हे सगळं सुरू असल्यानं एका नेत्याला अटक होईल असं म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

वाचा:

‘देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. याबाबत विचारलं असता, ‘ही नियमित भेट आहे. त्यात नवीन काही नाही. सहकार या विषयावर काही चर्चा झालीय असं वाटत नाही,’ असं ते म्हणाले. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मोठे अधिकारीच घोटाळ्यात अडकल्यानं कोणाचा कोणावर वचक राहिलेला नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here