नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. इतकंच नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्षदेखील नाशिकमध्ये आहेत. यामुळे राज ठाकरे यांच्या शासकीय विश्रामगृहात मोठी गर्दी झाली असून याचा पाकीटमारांनी चांगलाच फायदा उचलला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी पाकिटमारी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासकीय विश्रामगृहातील गर्दीत हातसफाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जागरूक कार्यकर्त्यांनी वेळीच सावधगीरी दाखवली आणि आरोपीस पकडले. अधिक माहितीनुसार, पळून जाणाऱ्या पाकिटमाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यापाठोपाठ अमित ठाकरेही आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत संदीप देशपांडेदेखील आहेत. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या बैठकीत मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आहेत. आज राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. आजच्या या बेठकीसाठी मुंबईतील मनसेचे काही प्रमुख नेतेसुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अमित ठाकरेसुद्धा या पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित राहत आहेत. त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठीच आज होणाऱ्या या राजकीय बैठका महत्त्वाच्या मानल्या जातात. अमित ठाकरेसुद्धा या बैठकीला उपस्थित राहिले आहेत. त्यामुळं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंवर नाशिकची जबाबदारी द्यावी, अशी मागणी नाशिक मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात येत आहे. या संदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे पदधिकारी व अमित ठाकरेंमध्ये चर्चाही झाल्याची माहिती मिळतेय.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here