मुंबई : गेल्या वर्षी सुरू झालेला करोनाचा तांडव अजूनही कायम आहे. करोनाची पहिली लाट गेली, करोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरते आहे तर करोनाची तिसरी लाटही धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. यामुळेच सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणं, हात सतत धुणं अशा अनेक गोष्टी आपण सतत डोळ्यांसमोर पाहतोय. पण तरीही यातून आपण काही शिकलो का? असा प्रश्न विचारला तर आजही राज्यात लॉकडाऊन या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसतं.

आजही सुरक्षित अंतर ठेवले जात नाही, स्वच्छताही फारशी पाळली जात नाही. पण याचा एक उत्तम व्हिडिओ महाराष्ट्राचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला आहे. माणसांना जरी करोना कळला नसला तरी पक्षांना मात्र हा जीवघेणा संसर्ग नक्कीच कळला आहे.
तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये काही पक्षी एकत्र खांबावर बसले आहेत. मात्र, यावेळी ते अगदी ठराविक अंतर ठेवून बसले आहेत. त्यामुळेच माणसांना अजूनही सोशल डिस्टंसिंग कळलं नाही पण पक्षांना योग्य पद्धतीने कळलं असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्विट केला आहे.

इतकंच नाही तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘पक्षांनाही सोशल डिस्टंसिंग कळलं पण माणसांना कधी कळणार?’ असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. खरंतर, करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण आरोग्य व्यवस्था पणाला लागली आहे. सर्व डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी हे गेल्या वर्षापासून जीव तोडून या जीवघेण्या संसर्गाचा सामना करत आहे. असं असलं तरी सोशल डिस्टंसिंग, स्वच्छता आणि आपली काळजी घेणे हे प्रत्येकाला कळलं नाही.

जोपर्यंत करोना रोखण्यासाठी नियमांचं पालन होणार नाही तोपर्यंत काही हा जीवघेणा संसर्ग थांबणार नाही. पण असं असलं तरी आजपर्यंत लॉकडाऊनचं काटेकोर पालन होताना कुठेही दिसत नाही. अनेक राजकीय कार्यक्रमांमध्येच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळतो. पर्यटनस्थळांवर ही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे करोना थांबणार नाही तर आणखी वाढेल आणि हीच सध्याची चिंतेची बाब आहे. त्यामुळे किमान या पक्षांच्या हुशारीकडे पाहून तरी माणसांना शिकायला हवं हेच खरं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here