भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आजपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदधिकारी व नगरसेवकांसोबत बैठका सुरू आहेत. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला असता पवार- मोदी भेटीवरही भाष्य केलं आहे.
‘लोकसभा आणि राज्यसभा सुरू होण्यापूर्वी काही विषयांवर चर्चा करण्यासाठी मोठे नेते पंतप्रधानांची भेट घेत असतात. कृषी कायदे, ओबीसी आरक्षण, सहकार खात्याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असावी. त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली असावी. या व्यतिरिक्त काही खास चर्चा झाली असेल तर माहित नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचाः
तसंच, शरद पवार व मोदी भेटीमुळं पुन्हा एकदा राज्याच्या राजकारण भूकंप होणार का?, अशा प्रश्नांना तोंड फुटले आहे. मात्र, चंद्रकांत पाटलांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ‘महाराष्ट्रात राजकीय घडामोड घडण्याची शक्यता कमीच आहे. कारण नाईलाज म्हणून महाविकास आघाडीला एकत्र राहावंच लागणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शरद पवार यांनी मोदींची भेट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times