नवी दिल्ली : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रजा वाढविण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार १ ऑक्टोबरपासून लेबर कोड म्हणजेच कामगार संहितेचे नियम लागू करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या २४० हून ३०० पर्यंत वाढू शकतात.

लेबर कोडमधील नियमांत बदल करण्याबाबत कामगार मंत्रालय, कामगार संघटना आणि उद्योग जगतातील प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली. यावेळी कामाचे तास, वार्षिक सुट्ट्या, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, सेवानिवृत्ती या घटकांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी अर्जित रजांमध्ये २४० वरून ३०० पर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती.

१ ऑक्टोबरपासून वाढणार सुट्ट्या?
केंद्र सरकार १ एप्रिल २०२१ पासून नवीन कामगार संहितेतील नियम लागू करणार होती, पण काही राज्यांची तयारी नसल्यामुळे आणि एचआर पॉलिसी बदलण्यासाठी जादा वेळ दिल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर आता १ जुलैपासून नवे नियम लागू करण्यात येणार होते, पण राज्यांनी पुन्हा वेळ वाढवून मागितली आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत २०२१ वेळ वाढविण्यात आला आहे. आता कामगार मंत्रालय आणि मोदी सरकार कामगार संहितेचे नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्याची शक्यता आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये संसदेने लेबर कोड इंडस्ट्रीयल रिलेशन, कामाची सुरक्षा, हेल्थ अॅण्ड वर्किंग कंडीशन आणि सामाजिक सुरक्षिततेशी संबंधित नियमांमध्ये बदल केले. हे नियम सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर करण्यात आले होते. हे नियम आणि कामगार संघटनेच्या मागण्यांना सरकारने हिरवा कंदील दाखवला तर १ ऑक्टोबर २०२१ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ३०० अर्जित रजा मिळू शकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here