: आधुनिक काळात वादाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींमध्येही बदल झाला आहे. मोबाईल, रिमोट अशा गोष्टींमुळे अनेकदा मुलांमध्ये वाद होत असल्याच्या घटना घडतात. मात्र हेडफोनमुळे वाद होऊन नंतर आतेभावाने बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अकोल्यात भावानेच बहिणीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. नेहा नंदनलाल यादव असं मृत १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे, तर २४ वर्षीय ऋषिकेश उर्फ़ बॉबी राममोहन यादव असं मारेकरी भावाचं नाव आहे.

बॉबी आणि नेहा या दोघांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास मोबाईलच्या हेडफोनवरुन वाद झाला होता. सुरुवातीला किरकोळ स्वरुपाचा असणारा हा वाद नंतर मात्र विकोपाला गेला आणि बॉबीने स्वत:वरील नियंत्रण गमावलं. या भांडण्यात त्याने थेट आपली बहिण नेहाला गळ्यावर चाक़ूने वार करून गंभीर जखमी केले. तिची आरडाओरड पाहता शेजाऱ्यांनी लागेच घटनास्थळ गाठले.

शेजारील काही व्यक्ती घरात आल्या तेव्हा नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. जखमी नेहाला उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यत तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा आतेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हेडफोनवरुन झालेल्या वादातूनच ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यामागे दुसरे कोणते कारण आहे का, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here