मुंबई : राजधानी मुंबईसह आसपासच्या शहरातही पावसाने (Mumbai Rain Update) जोरदार हजेरी लावली आहे. सीएसटी, कल्याण, भांडूप या परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाणे आणि रायगडमध्येही मेघगर्जनेसह मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात ढगांनी मोठी दाटी केली आहे. त्यामुळे मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
‘उपग्रह चित्रात मुंबई, ठाण्यासह कोकणात ढगांची दाटी दिसत असून द. मध्य महाराष्ट्रातही मोठे ढग दिसत आहेत,’ अशी माहिती हवामान खात्याचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत दिली आहे.
दरम्यान, रात्रभर मुंबईत पावसाचा असाच जोर राहिला तर रविवारी शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times