: सातारा तालुक्यातील ढगेवाडी येथे एका घरातून पतीनेच ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची तक्रार पत्नीने सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पती आणि त्याचे दोन मित्र असा तिघांवर गुन्हा दाखल झाला असून विजय जाधव, निलेश फरांदे आणि सचिन बरकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, पतीनेच दोन मित्राच्या मदतीने घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्यामुळे ढगेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, हिराबाई विजय जाधव (वय २६, रा. ढगेवाडी, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिराबाई यांचे पती विजय दादा जाधव आणि त्याचे मित्र निलेश बाजीराव फरांदे (रा. आनेवाडी, ता. सातारा) आणि सचिन तात्याबा बरकडे (रा. ढगेवाडी, ता. सातारा) या तिघांनी राहत्या घरात असणाऱ्या लाकडी कपाटातील डबीमध्ये ठेवलेले ४५ हजार रुपयांचे मनी मंगळसूत्र चोरुन नेले.

हा प्रकार दि. ८ जुलै ते दि. १५ जुलै रोजी सायंकाळी पाच या वेळेत घडला आहे. याप्रकरणी हिराबाई यांनी शुक्रवार, दि. १६ रोजी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विजय जाधव, निलेश फरांदे आणि सचिन बरकडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास सहायक फौजदार बागवान करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here