नाशिक : आज नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विश्रामगृहाबाहेर भेट झाली. या भेटीनंतर मनसे आणि भाजपमध्ये युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्यावर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदे घेत स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे यांचा चेहरा आश्वासक आहे असे चंद्रकांत पाटील म्हटलं असून ही भेट फक्त सदिच्छा असून यामध्ये युतीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांच्यासोबत युती विषयी झालेल्या चर्चेच्या प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे आश्वासक चेहरा आहे. परंतु, त्यांनी परप्रांतीय विरोधी भूमिका बदलली तर भाजपकडून त्यांचं नक्कीच स्वागत आहे. आम्ही त्यांच्या सोबत येऊ शकतो. पण यावर फक्त चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करूनच घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो असं राज ठाकरेंनी मला सांगितल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ते कशावरही बोलू शकतात असा टोला त्यांनी लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times