फेसबुकचा हा प्रोग्राम त्यांच्या व्ह्यू पॉइंट मार्केट रिसर्च अॅपवर उपलब्ध आहे. या प्रोग्रामसाठी एक चाचणी द्यावी लागणार आहे. जर या चाचणीत तुम्ही उत्तीर्ण झालात तर या प्रोग्राममध्ये तुमचा समावेश केला जाईल. या प्रोग्राम अंतर्गत आधीच तुम्हाला या पोर्टल सोबत फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमध्ये आपल्या एखाद्या मित्राचे नाव बोलून दाखवून रेकॉर्ड करावे लागेल. त्यानंतर या प्रक्रिये अंतर्गत आणखी १० मित्रांचे नाव बोलून दाखवावे लागणार आहे. रेकॉर्डिंगचा एक सेट पूर्ण झाल्यानंतर फेसबुक तुम्हाला २०० पॉइंट देईन. त्यानंतर PayPal च्या माध्यमातून ५ डॉलर म्हणजेच ३६० रुपये मिळेल. जर १ हजारांपेक्षा कमी पॉइंट झाल्यास तुम्हाला फेसबुक रिडिम करणार नाही.
या रेकॉर्डिंग संदर्भात बोलताना फेसबुकने सांगितले की, व्हाईस रेकॉर्डिंगला प्रोफाइलला कनेक्ट करण्यात येणार नाही. फेसबुकचा हा प्रोग्राम सध्या अमेरिकेत आहे. भारतात कधी होईल, यासंबंधी फेसबुकने अद्याप काहीही माहिती दिली नाही. या प्रोग्राममध्ये १८ वर्षाहून अधिक वय असलेले तरूण युजर्स सहभागी होऊ शकतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times