Live अपडेट्स…
>> विक्रोळीत आणखी एकाचा मृत्यू, मृतांची संख्या ६ वर.
>> मुंबई, पालघर आणि डहाणूमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता.
>> मुंबईतील दुर्घटनांमध्ये झालेल्या दुर्घटनांमध्ये नागरिकांच्या मृत्यूंमुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला शोक.
>> (क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)
>> मुंबईत चेंबूर येथील आरसीएफ परिसरात भारत नगरात आणखी एक दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू.
>> चेंबूर परिसरातील डोंगरांवर राहणाऱ्या नागरिकांना तातडीने स्थलांतरित करणार- पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा.
>> चेंबूरमधील घटनास्थळी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट.
>> जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्याची राज्य सरकारची घोषणा.
>> केंद्र सरकारचीही मृतांच्या नातेवाईकांची प्रत्येकी दोन लाखांची मदत.
>> मुंबईतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत.
>> मुंबईतील अनेक सखल भागात साचले पावसाचे पाणी.
>>
(क्लिक करा आणि वाचा सविस्तर वृत्त)
>> मुंबईतील मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम, रस्तेवाहतूकही झाली प्रभावीत.
>> चेंबूर परिसरात डोंगरावर वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी स्थलंतरीत करू- नवाब मलिक
>> चेंबूरमधील दुर्घटनास्थळी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली भेट.
>> भांडूपमध्येही एका दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू.
>> चेंबूरमधील भारतनगर परिसरात दरड कोसळली, तीन जण ठार झाल्याती भीती
>> विक्रोळी येथे आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली अकडल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
>> विक्रोळी येथे बचावकार्य सुरू आहे.
>> मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश
>> मुंबईतील विक्रोळी परिसरात घरावर दरड कोसळ्याने एकूण ५ जणांचा मृ्त्यू झाला आहे.
>> मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरावर दरड कोसळून १७ लोकांचा मृत्यू
>> मध्यरात्रीनंतर मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले. पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होता मुसळधार पाऊस.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times