अंगावर काटा उभा करणाऱ्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुंबईहून वारणसीला जाणाऱ्या ट्रेनसमोर हा प्रसंग घडला. ही वयोवृद्ध व्यक्ती थेट रेल्वे रुळ ओलांडत पुढे जात होती. मात्र, मुंबई-वाराणसी ही ट्रेन येत असल्याचे त्या व्यक्तीच्या लक्षात आले नाही. मात्र ट्रेनेते लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक एल. पी. रविशंकर यांनी मात्र एक वयोवृद्ध व्यक्ती ट्रेनखाली येणार हे पाहिले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपात्कालिन ब्रेक दाबला. ट्रनचा धक्का लागून हे वयोवृद्ध खाली कोसळले आणि ट्रेनच्या खाली गेले. मात्र तेवढ्यात ट्रेन थांबली होती.
क्लिक करा आणि वाचा-
ही घटना पाहताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. ट्रेनच्या खाली अडकलेल्या या व्यक्तीला या लोको पाटलय आणि रेल्वे चालकांनी खेचून बाहेर काढले. ही व्यक्ती सुखरूप असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. काही ठिकाणी अंगावरील शर्ट फाटला आहे. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने एका वयोवृद्ध व्यक्तीचे प्राण वाचले.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times