‘उद्धव ठाकरे यांना पंतप्रधानसुद्धा केलं पाहिजे, कारण एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत. लोकाभिमुख प्रशासन देणे, हे शक्य आहे. ते लोकांना केंद्रभागी ठेवून करता येते,’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अकार्यक्षम आहेत, याचा साक्षात्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सात वर्षांनंतर अचानक कसा झाला? ते अकार्यक्षम होते, तर त्यांना मंत्रिपदावर का ठेवले? त्यामुळे देशाचे किती नुकसान झाले आणि त्याला जबाबदार कोण?’ असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केला. तसंच ‘मोदींना सतत प्रसिद्धी हवी असते,’ असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
नाना पटोले यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण
‘प्रत्येक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला पक्षाची वाढ करायची असते. त्यामुळेच कॉँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी पटोले स्वबळाची भाषा बोलले असावेत. मात्र, त्यांच्या विधानांचा विपर्यास केला जात आहे,’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पाठराखण केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times