कोलंबो: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ७ विकेटनी शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने भारतापुढे विजयासाठी २६३ धावांचे आव्हान दिले होते, हे लक्ष्य भारताने ३६.४ षटकात ३ विकेटच्या बदल्यात बार केले. भारताकडून इशान किशन, कर्णधार शिखर धवन यांनी अर्धशतक झळकावली. स्फोटक ४३ धावा करणाऱ्या पृथ्वीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दोन्ही संघातील दुसरी लढत २० जुलै रोजी होणार आहे.

वाचा-

पहिल्या वनडेत २६३ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताला सलामीवीर पृथ्वी शॉने स्फोटक सुरूवात करून दिली. त्याने संघाला ५ ओव्हरमध्ये ५० धावा करून दिल्या. पण वेगाने खेळण्याच्या नादात पृथ्वी ४३ धावांवर बाद झाला. त्याने २४ चेंडूत ९ चौकारांसह इतक्या धावा केल्या.

वाचा-

पृथ्वीच्या जागी आलेल्या विकेटकीपर इशान किशनने पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून लंकेच्या गोलंदाजांना इशारा दिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. भारताकडून पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. इशानने देखील पृथ्वी प्रमाणे आक्रमक फलंदाजी केली. त्याने टी-२०तील पदार्पणाप्रमाणे वनडेतील पदार्पणात अर्धशतक झळकावले. इशानने ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावा केल्या.

वाचा-

त्यानंतर आलेल्या मनिष पांडेने कर्णधार शिखर धवनसह तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी करत संघाचा विजय निश्चित केला. मनिष २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर विजयाची औपचारिकता शिखर आणि सूर्यकुमार यादव यांनी पूर्ण केली. धवनने नाबाद ८६ , तर सूर्यकुमारने नाबाद ३१ धावा केल्या.

वाचा-

त्याआधी लंकेला अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानूका यांनी चांगली सुरूवात करून दिली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४९ धावा केल्या. अविष्काला बाद करत चहलने लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने १७व्या षटकात पहिल्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल श्रीलंकेची अवस्था १ बाद ८४ वरून ३ बाद ८९ अशी केली.

वाचा-

दीपक चहरने धनंजय डी सिल्वाला बाद करत लंकेला चौथा धक्का दिला. श्रीलंकेने १६६ धावात पाच विकेट गमावल्या होत्या. चामिका करुणरत्ने, कर्णधार शनाका आणि चरित असालांका हे दोन खेळाडू वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यांनी ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. पण अखेरच्या षटकात लंकेच्या तळातील फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे त्यांना २५० धावांचा टप्पा पार करता आल्या.

वाचा-

श्रीलंकेने ४८ षटकात २३० धावा केल्या होत्या. पण त्यानंतरच्या दोन षटकत त्यांनी ३२ धावांची वसुली केली आणि भारतासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करून दिली. चामिका करुणरत्नेने ३५ चेंडूत नाबाद ४५ धावा केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here