मुंबईः पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी अनैसर्गिक पावसाचा दगाफटका होतो. १७ जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळंच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेनं ()भाजपवर निशाणा साधला आहे. ()

शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी पडझड झाली. विरोधकांनी महापालिकेला लक्ष्य करत पालिकेच्या कामावर टीका केली होती. यावर शिवसेनेनं आज सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करत या दुर्घटनांचे खरे कारण सांगितलं आहे.

‘मुंबईतील जागेची अडचण आणि त्या तुलनेत असलेली मोठी लोकसंख्या यामुळं निवासाचा प्रश्न पूर्वांपार बिकट आहे. त्यातून मुंबई आणि उपनगरांमधील छोटे- मोठे डोंगरही सुटलेले नाहीत. निसरड्या डोंगरउतारांवर वसलेल्या या झोपडपट्ट्यांत हजारो कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दर पावसाळ्यात त्या वस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘मुळात मुंबईच्या स्वतःच्या भौगोलिक मर्यादा आहेत. त्याच्या विपरीत लोकसंख्येचा भार या शहराला पेलावा लागत आहे. आधीच जागेची मर्यादा आणि त्यात अमर्याद मानवी लोंढे यामुळे मिळेल तेथे, जमेल तसे राहा हे समीकरण दृढ झाले. मानवी लोंढे न थांबल्याने मुंबईतील निवासाचे गणित अधिकच जटील झाले आहे,’ असंही शिवसेनेनं सामनातून निदर्शनास आणून दिलं आहे.

‘अलीकडील वर्षांत मुंबईतील पावसाची लहरही फिरली आहे. ‘कमी वेळेत प्रचंड पाऊस’ हे त्याचे वैशिष्ट्य झाले आहे. आताही मागील तीन दिवसांत मुंबईत तब्बल ७५० मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस कोसळला. जुलै महिन्यात एका दिवसात एवढा पाऊस पडण्याची मागील १२ वर्षांतील ही चौथी वेळ आहे. ज्या शनिवारी मुंबईत पावसाने ११ दुर्घटना घडल्या, ३० जीव घेतले त्या शनिवारी तब्बल २३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कमी वेळेत पडणारा प्रचंड पाऊस कधी मालाड-मालवणीसारख्या, कधी डोंगरीसारख्या तर कधी चेंबूरसारख्या दुर्घटनांचा तडाखा मुंबईला देत आहे. पावसाळय़ापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here