वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अध्यक्ष यांनी रविवारी यांना पंजाबचे म्हणून नियुक्त केले. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आक्षेप असूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री उशिरा सिद्धू यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली. सिद्धू यांच्यासह संगतसिंग, सुखविंदरसिंग, पवन गोएल, कुलजितसिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांचे सरळसरळ दोन गट पडल्याची रविवारी दिवसभर चर्चा होती. सुनील जाखड यांच्या जागी सिद्धू यांची नियुक्ती करण्यात आली.

पंजाबमध्ये २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हापासून विविध आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अमरिंदर यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी त्यांनी संपादित केल्याचे दिसत आहे.

पंजाबमधील काँग्रेसचे अकरापैकी नऊ खासदार रविवारी प्रतापसिंग बाजवा यांच्या निवासस्थानी रविवारी भेटले. सिद्धू यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदावरून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याबरोबर सिद्धू यांचे वाद आहेत. सोनिया गांधी यांनी घेतलेला कुठलाही निर्णय सर्वांना स्वीकारार्ह असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here