मुंबईः शनिवारी व रविवारी कोसळलेल्या पावसाने मुंबईची पुन्हा दाणादाण उडवली आहे. आजही मुंबईत काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईला पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ()

महाराष्ट्र किनारपट्टीपासून कर्नाटकाच्या किनारपट्टीपर्यंत ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पूर्व-पश्चिम वाऱ्यांची स्थितीही सध्याच्या पावसासाठी अनुकूल आहे.

Live Update:

ठाणेः पिसे येथील पंपाच्या स्टेनरमधे नदीतील गवत अडकल्याने पंपाचा फ्लो कमी झाला आहे. त्यामुळे पिसे येथून पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्यामुळे शहरांतील सर्व भागांत आजपासुन पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार

ठाणेः पिसे परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून रेड अलर्ट

ठाणे, रत्नागिरी, पालघरमध्ये २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईः मध्य व हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्ववत

नाशिक : शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सकाळी सातवाजेपर्यंत मध्यम-उच्च सरींची संततधार सुरू; चार तासांत ९.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here