मुंबई: मुंबई व ठाण्यात शनिवारी मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळं ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून मुंबईत विविध ठिकाणी अनेक लोक मरण पावले आहेत. आता याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुंबई महापालिका व राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. भाजपचे आमदार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला आहे. (BJP MLA Targets CM Over )

करोनाची साथ आल्यापासून मुख्यमंत्री हे क्वचितच बाहेर पडले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाऊन गर्दी करण्यापेक्षा घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, त्यांना आवश्यक त्या सूचना देणे असा मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्न राहिला आहे. उद्घाटनांचे बहुतेक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यपद्धतीवर सुरुवातीपासूनच टीका करत आहेत. मुख्यमंत्री घर सोडत नाहीत, लोकांना दिलासा कोण दिसणार? असा प्रश्न भाजपकडून केला जात आहे. आता पुन्हा एकदा भाजपनं त्याच मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

वाचा:

मुंबईत परवापासून जोरदार पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणी तुंबले. अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. सुमारे २५ लोक मरण पावले व अनेक जखमी झाले. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना केल्या. त्याच अनुषंगानं आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट केलं आहे. ‘मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर…’ असा टोला भातखळकर यांनी हाणला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचं टिपणही त्यांनी ट्वीटसोबत जोडलं आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here