सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्यूट व्हिडीओमध्ये राहुल वैद्य झीवाला सांगतो, ‘मला बिस्किट दे, एकटीच खात आहेस तू तर’ त्यावर झिवा एका प्लेटमधून एक बिस्किट उचलते आणि राहुलकडे जाते, राहुल तिचे आभार मानतो. त्यानंतर राहुल स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सामन्याविषयी बोलताना दिसतो. झीवा आणि राहुलचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
राहुल वैद्यने महेंद्रसिंह धोनीसोबत एक बाथरुम व्हिडीओ देखील शूट केला होता. जो इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. याशिवाय धोनीची पत्नी साक्षीच्या ३० व्या वाढदिवसालाही राहुल वैद्यनं हजेरी लावली होती. ज्याचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला होता आणि यात धोनी राहुलसोबत धम्माल मस्ती करताना दिसला होता.
याशिवाय अन्य एका व्हिडीओमध्ये राहुल वैद्य धोनीसोबत सेल्फी घेताना दिसत आहे आणि त्यावेळीच राहुल धोनीला म्हणतो, ‘जेव्हा जेव्हा मी तुमच्यासोबत फोटो क्लिक करतो तेव्हा ही पहिलीच वेळ आहे असं प्रत्येक वेळी वाटतं.’ त्यावर धोनी हसत हसत त्याला म्हणतो, ‘हे तू मला सांगत आहेस की, विचारत आहेस.’ त्यानंतर तो हसून बाजूला होतो. याशिवाय धोनी आणि राहुल वैद्य यांचे इतर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times