शाहजहाँ आणि मुमताज यांना दफन केल्यानंतर आज ३८९ वर्षांनी असे पहिल्यांदाच होत आहेत. मुमताज महल यांना १६३१ साली, तर शाहजहाँ यांना १६६६ साली दफन करण्यात आले. कबरीची प्रतिकृती स्वच्छ आणि आकर्षक दिसण्यासाठी क्ले मॅप मड थेरपी केली जात आहे. शाही जोडप्याची खरीखुरी कबर त्यांच्या संगमरवरी प्रतिकृतीच्या तुलनेत अधिक साधेपणाने तयार करण्यात आली होती. तळघरात असलेल्या एका चेंबरमध्ये त्यांच्या कबरी अस्तित्वात आहेत.
शाहजहाँ आणि मुमताज यांच्या खऱ्या कबरी वर्षातून फक्त तीन वेळा सर्वसामान्य लोकांना दाखवण्यासाठी खुल्या केल्या जातात. शाहजहाँ यांच्या वार्षिक उर्स कार्यक्रमात येणाऱ्या लोकांनाही या कबरी पाहता येत नाहीत. २२ पायऱ्या उतरल्यानंतर अतिशय चिंचोळ्या अशा भागात या कबरी आहेत. आता पर्यंत कोणत्याही परदेशी पाहुण्याने किंवा राष्ट्राध्यक्षांनी या कबरी पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या (एएसआय) विज्ञान शाखेचे पुरातत्व शास्त्रज्ञ एम. के. भटनागर या कबरींच्या प्रतिकृतींची थेरपी करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्याच आठवड्यात या कबरींवर मड पॅक ट्रीटमेंट करणे सुरू करण्यात आली होती आणि आता हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे भटनागर म्हणाले.
भारतीय महिलांमध्ये क्ले पॅक ट्रीटमेंट अतिशय लोकप्रिय आहे. पारंपरिक पद्धतीने चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य खुलवण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो. विपुल प्रमाणात उपलब्ध असलेली चुन्याच्या चिकन्या मातीच्या (क्ले) थराचे प्रभावित भागावर लेपन केले जाते. त्यानंतर ते सुकू दिले जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times