पुणे: एटीएम फोडून त्यातून रोख रक्कम चोरून नेण्याच्या घटना नवीन नाहीत. एटीएम मशिन चोरून नेल्याचे प्रकारही क्वचित घडतात. ग्रामीण पोलिसांनी अशाच एका एटीएम मशिन चोरांच्या (ATM Machine Theft) टोळीचा पर्दाफाश केला आहे. चौकशीत त्यांनी एटीएम मशिन चोरीची सांगितलेली पद्धत चक्रावून टाकणारी आहे.

शुभम गायकवाड ऊर्फ सोनू (२१) आणि मंगेश काळूराम गाडेकर (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही शिरूरचे रहिवासी आहेत. त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत. चारचाकी गाडी आणि दोरखंडाचा वापर करून ते एटीएम मशिन चोरायचे. कारला बांधलेला जाडसर दोर एटीएम मशिनला बांधून ही टोळी आधी मशिन उपसून काढत आणि नंतर ती पळवून नेत.

वाचा:

पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी काही लोकांनी येथील एक एटीएम मशिन उपसण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखालील पथकानं या प्रकरणी समांतर तपास सुरू केला. त्याच दरम्यान मिळालेल्या माहितीवरून, पोलिसांनी शिरूर शहरात एका ठिकाणी सापळा रचला. त्यात शुभम गायकवाड व गाडेकर हे अलगद सापडले. त्यांनी आतापर्यंत अशा पद्धतीनं अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here