केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मौलाना अब्दूर रशीद अन्सारी, मौलाना अमानुल्लाह खान, कारी ओवेस साहेब, मोहम्मद कलीम शेख, मुस्तफा अन्सारी यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने आठवले यांना भेटून काही मागण्या केल्या. यामध्ये, बकरी ईद या सणासाठी बकऱ्यांची ऑनलाइन खरेदी ऐवजी बाजारात विक्री सुरू करावी, तसेच कुर्बानीसाठी देवनार येथील पशुवधगृहात परवानगी द्यावी अशा मागण्यांचा समावेश आहे. सरकारने सूचवलेली प्रतिकात्मक कुर्बानी इस्लाम धर्मात मान्य नसून ही पद्धत राज्य सरकारने मु्स्लिमांवर लादू नये, अशी मागणी मौलाना अब्दूर रशीद अन्सारी यांनी आठवले यांच्याकडे केली. मुस्लिम समाजाच्या मागण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना पत्राद्वारे करणार असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, राज्यात करोनाच्या संकटामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच बकरी ईद या सणाच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करण्यासाठी मशिदीत न येता प्रत्येकाने आपल्या घरात नमाज पढावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तसेच करोनाचा प्रादुर्भाव पाहता जनावरांचे बाजार सध्याच्या बंदच राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाण नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने जनावरांची खरेदी करावी, किंवा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावीत, असे आवाहनही मुस्लिम बांधवांना करण्यात आले आहे. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, असे सरकारने सूचवले आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहणार असून या निर्बंधांमध्ये बकरी ईदेनिमित्त कोणतीही शिथीलता देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times