मुंबई: ‘भारतीय जनता पक्ष पाच वर्षे शिवसेनेसोबत सरकारमध्ये होता. सरकारमध्ये सोबत असतानाही (Shiv Sena) रोज भांडायची. रोज जाकिट सावरत यायचे. आपण सरकारमध्ये आहोत हेही त्यांना कळायचं नाही. रोज आम्हाला शिव्याशाप दिले जायचे. रोज बाहेर पडण्याची, राजीनाम्याची भाषा केली जायची. माझ्याकडं तेव्हा आठ खाती होती. त्यांच्यासोबत सरकार चालवल्यामुळं माझ्या डोक्यावरचे केस उडाले,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष () यांनी आज शिवसेनेवर टीका केली.

वाचा:

भाजपच्या ओबीसी मोर्चाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेसोबत सरकार चालवण्याचा अनुभव किती भयंकर होता हे आपल्या खास शैलीत सांगितलं. ओबीसीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘एकतर अनेक विषयांमधलं ह्यांना काही कळत नाही. खोडा घालायचा एवढंच कळतं. त्यामुळं आपल्याला आपल्या ताकदीवर एकहाती सरकार आणायचं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सांगतील, त्या दिशेनं आपण सगळे धावूया,’ असं पाटील म्हणाले. ‘ओबीसी आरक्षणासाठी जागर अभियान आपल्याला करायचंच आहे. फेब्रुवारीची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय करायची असा महाविकास आघाडी सरकारचा प्लान आहे. एकदा का निवडणूक झाली की पाच वर्षे काहीही होऊ शकणार नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. पण त्यांचा हा प्लान यशस्वी होऊ द्यायचा नाही,’ असं आवाहन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केलं. ‘हे सरकार किती दिवस आहे माहीत नाही. रोज सकाळी पडलं, पडलं असं वाटतं, पण संध्याकाळी पुन्हा उभं राहतं,’ असा मिश्किल टोला पाटील यांनी हाणला.

चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की हेटाळणी?
देशातील १३ राज्यांतील मुख्यमंत्र्यांपैकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वाधिक लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष अलीकडंच एका सर्वेक्षणातून पुढं आला आहे. त्या अनुषंगानं बोलताना, ‘ हे चांगलं काम करत आहेत, लोकप्रिय आहेत तर त्यांना पंतप्रधान करा,’ असं चव्हाण म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. ‘ यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली की हेटाळणी हे तुम्हीच ठरवा,’ असं सूचक वक्तव्य पाटील यांनी केलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here