म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर

कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) अंतर्गत बरांज खुली कोळसा खाण येथील साडेचार लाख टन कोळशाची चुकीच्या पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. हा कोळसा कुठे गेला, त्याची अवैधरित्या वाहतूक तर करण्यात आली नाही ना, असे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बरांजच्या साडेचार लाख टन कोळसा चोरीसंदर्भात प्रशासनाने तात्काळ करावी, असे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिले. ( ordered an inquiry into the theft of 4 lakh 50 thousand tonnes of baranj coal)

जिल्हाधिकारी कार्यालयात बरांज खुली कोळसा खाण संदर्भात कामगारांच्या समस्या तसेच बरांज गावातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी सदर आदेश दिले.

क्लिक करा आणि वाचा-
बरांज खुली कोळसा खाणीतील साडेचार लाख टन कोळसा २०१८ पूर्वी बेपत्ता झाला आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की, हा कोळसा जाळण्यात आला असेल तर त्याची राख लोकांच्या नजरेस पडायला पाहिजे होती. तसेच स्थानिकांना याबाबत माहिती असती. मात्र याबाबत सर्व जण अनभिज्ञ असून यात मोठे गौडबंगाल झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बरांजचा कोळसा अवैधरित्या उचलण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याने प्रशासनाने याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, पुनर्वसन विभागाचे उप जिल्हाधिकारी जे.पी.लोंढे, विशाल दुधे प्रामुख्याने उपस्थित होते.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here