आसाराम कुमरे(३३)रा.कोटलडोह असं आरोपीचं नाव असून सध्या तो फरार आहे. तुळसाबाई कल्लो या कोटलडोह येथे आपल्या मुलीला भेटायला गेल्या होत्या. रविवारी सकाळी मुलीच्या कुटुंबातील लोक शेतावर गेले होते. घरी कुणीच नसल्याची संधी साधून तुळसाबाई यांच्या जावयाचा भाऊ आसाराम कुमरे याने शेतीच्या मुद्द्यावरून त्यांच्याशी वाद घालून मारहाण केली.
यामुळे तुळसाबाई घाबरुन पोलिस पाटलांच्या घरी लपून बसल्या. परंतु तेथेही कुणीच नसल्याने आसारामने पुन्हा तुळसाबाईंवर काठीने प्रहार केला. या हल्ल्यात त्या जागीच ठार झाली. संध्याकाळी मुलीच्या घरची मंडळी शेतावरुन परतल्यानंतर तुळसाबाई या मृतावस्थेत आढळून आल्या.
दरम्यान, याप्रकरणी पुराडा पोलिसांनी आसाराम कुमरेवर गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक शेडके, पोलिस हवालदार संतोष धोटे, पोलिस नाईक यशवंत जुमनाके, हवालदार प्रीती ठाकरे आरोपीचा शोध घेत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times