वाचा:
मुंबईतील करोनाचा विळखा सैल झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होऊ लागली आहे. मुंबईत रविवारी ४५४ नवीन रुग्ण आढळले होते. तो आकडा आज ४०२ पर्यंत खाली आला आहे. तर ५७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले असून मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ६ हजार ३४९ इतकी कमी झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत करोनाने १४ रुग्ण दगावले असून त्यातील ९ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. १४ मृतांमध्ये ९ पुरुष आणि ५ महिला होत्या. दोन रुग्ण ४० वर्षाखालील, ५ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील तर ७ रुग्ण ६० वर्षांवरील होते.
वाचा:
मुंबईत करोना रिकव्हरी रेट सध्या ९७ टक्के इतका आहे तर १२ जुलै ते १८ जुलै या कालावधीत ०.०६ टक्के इतका राहिला आहे. सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ३४ दिवसांवर पोहचला आहे. आज पालिका क्षेत्रात एकूण २३ हजार ४८१ चाचण्या घेण्यात आल्या. सध्या चाळी आणि झोपडपट्टी विभागात ६ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ६२ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
वाचा:
आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती
२४ तासात बाधित रुग्ण – ४०२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ५७७
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०७१२९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ६३४९
रुग्ण दुप्पटीचा कालावधी – १०३४ दिवस
कोविड वाढीचा दर (१२ जुलै ते १८ जुलै)- ०.०६%
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times