जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांच्यासह शिवसेनेच्या चार माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचक्रोशीतील १०० हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीनं अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच आणि उपसरपंचासह गोवळ मधल्या ग्रामपंचायतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जवळपास दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. मात्र तब्बल दीड वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलत नाही हे पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला.
दरम्यान, झाल्यास कोकणाला मोठा फटका बसेल, असा दावा करत गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाला विरोध करत आहे. या मुद्द्यावरूनच तत्कालीन युती सरकारमध्ये शिवसेनेचा भाजपसोबत वादही झाला होता. मात्र आता पक्षातील कार्यकर्तेच या प्रकल्पाचं समर्थन करत भाजपमध्ये प्रवेश करू लागल्यानंतर शिवसेना आगामी काळात काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times