मुंबई: मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिलं. सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असं सांगतानाच करतानाच काही मदत लागली, माझी गरज पडली तर उभं राह्यचं. यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी आज स्पष्ट केलं.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी राज्य सरकार पाच वर्षे टिकेल याची शाश्वतीही दिली. सरकारबद्दल मला स्वतःला शंका वाटत नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे संमिश्र सरकार असून हे सरकार पाच वर्षे चालेल. या सरकारचे नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसऱ्यांच्या कामात ते हस्तक्षेप करत नाहीत. समन्वय समिती मिळून आम्ही एकत्र प्रश्न सोडवतो. त्यामुळे सरकार पाच वर्षे चालेल यात काही शंका नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. जुन्या सरकारचे काही निर्णय बदलले, त्याचा राज्यावर विशेष परिणाम होईल असं वाटत नाही, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीत मूलभूत फरक असल्याचं सांगितलं. काँग्रेसमध्ये निर्णयाला दिल्लीत जावं लागतं. शिवसेनेचे निर्णय मुंबईतूनच होत असतात. आज काँग्रेसने त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. सहकार्य करायचे आणि सरकार टिकवायचे ही भूमिका काँग्रेसमध्ये दिसते, असं सांगतानाच शिवसेना म्हणून आमचा शिवसेनेशी कधी संपर्क आला नाही. पण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्याशी खूप संपर्क होता. एखादा शब्द दिला तर तो पूर्ण करायचेच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आपण मराठीचे अभिमानी आहोत. पण अनेक ठिकाणी हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे भाषिक ऐक्य असले पाहिजे, असं सांगतानाच साहित्य, संगीत,नाटक ह्या गोष्टीचा राज्यात प्रसार वाढला पाहिजे. सुसंस्कृत समाज असलेला महाराष्ट्र असला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here