मुंबई: ‘विरोधी पक्षातील नेत्यांना पशू-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते यांना प्रत्युत्तर दिले आहे. ( )

वाचा:

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजप ओबीसी मोर्चा कार्यकारिणी बोलताना सरकारवर तोफ डागली होती व बोलके पोपट म्हणत आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले होते. त्यावर नवाब मलिक यांनी पलटवार केला. ‘विरोधी पक्षातील नेत्यांना पशू-पक्ष्यांची उपमा देणे ही भाजपची संस्कृतीच आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री हे विरोधी पक्षातील नेत्यांना साप, विंचू तर कधी कुत्राही बोलले आहेत. आता देवेंद्र फडणवीस हेसुद्धा तेच काम करत आहेत. विरोधी नेत्यांना पक्ष्यांची उपमा त्यांच्याकडून दिल्या जात आहेत. यावरून त्यांची सवय आणि संस्कृती समोर येते’, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.

वाचा:

काय म्हणाले होते फडणवीस?

प्रश्नी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी भाजपकडून अनेक हातखंडे वापरले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबई येथे भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठक बोलावण्यात आली होती. पुढील व्यूहरचना आखण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. ‘राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. या मुद्द्यावर खोटे बोल पण रेटून बोल असा कारभार चालला आहे. आपली चूक झाली हे माहीत असल्याने सध्या महाविकास आघाडीतील प्रमुख नेते कमी बोलत आहेत आणि त्यांचे बोलके पोपट जास्त बोलत आहेत. पण मी त्यांना दोष देणार नाही. मालक जसे सांगतात तसे हे पोपट बोलतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी निशाणा साधला होता. त्यावरूनच नवाब मलिक यांनी पलटवार केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here