नाशिक: इगतपुरीतील प्रकरणी अभिनेत्री हिच्यासह अन्य २४ संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. परंतु, अंमली पदार्थ बाळगणाऱ्या याच्यासह ‘बर्थ डे बॉय’ पीयूष सेठीया या दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. ( )

वाचा:

गेल्या महिन्यात ग्रामीण पोलिसांनी ही रेव्हपार्टी उधळली होती. संशयितांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. याशिवाय, अंमली पदार्थ पुरवणारे व पार्टीसाठी बंगला उपलब्ध करून देणारे यांनाही अटक करून ‘एनडीपीएस’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. हिना पांचाळ हिच्यासह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित कोरिओग्राफर, फोटोग्राफर १२ तरुणी, १० तरुण अशा एकूण २२ संशयितांना अटक करण्यात आली होती. याशिवाय, मुंबईतून नायजेरीन व्यक्ती उमाही पीटर यालाही अटक झाली होती.

वाचा:

यांच्या पथकाने केली होती कारवाई

येथे २७ जून रोजी दोन बंगल्यांमध्ये सुरू असलेल्या रेव्हपार्टीवर छापा मारून ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने तब्बल २८ जणांना अटक केली होती. यातील २५ संशयितांविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात ७ जुलै रोजी कोर्टाने सर्व संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली. यानंतर संशयितांनी कोर्टाकडे जामिनासाठी अर्ज केला. त्यावर पुढील सुनावणी होऊन २४ संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी छापा मारला त्यावेळी संशयितांकडे प्रत्यक्षात पाच ग्रॅम कोकेन आढळून आले होते. छाप्यामुळे गोंधळ वाढला त्यावेळी संशयितांपैकी काहींनी आपल्याकडील कोकेन बंगल्यातील स्विमिंग पूलच्या पाण्यात फेकून दिले होते. ही बाब पोलिसांना समजल्यानंतर पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल मिळाला असून, पाण्यात कोकेनचा अंश आढळून आला आहे. या पार्टीत हिंदी व दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींसह परदेशातील तरुण-तरुणींचाही भरणा होता.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here