मुंबईः आषाढी एकादशीनिमित्त () () आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते परंपरेनुसार विठुरायाची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपुरला रवाना झाले होते. यावरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

मुंबईत शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी दरड, भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. यावरुन विरोधी पक्षनेत्यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठुरायाच्या महापुजेसाठी स्वतः कार चालवत पंढरपूरला रवाना झाले होते. यावरुनही विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे नेते यांनी एक ट्वीट केलं आहे.

वाचाः

संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, हे बा विठ्ठला जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच ते स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊदेत आणि जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊदेत. हीच तुझ्या चरणी प्रार्थना, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

वाचाः
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त आज पंरपरेला अनुसरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक महापूजा केली. आज पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे.भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे…यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे…माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here